Never Go Back (नेव्हर गो बॅक)
Never Go Back (नेव्हर गो बॅक)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एकटेपणाने आयुष्य काढणारा जॅक रीचर सामान्य माणूस नाही. त्याच्याकडे असामान्य बुध्दी आहे आणि तशीच अफाट ताकदही. अन्यायाविरूध्द लढण्यासाठी कधीही कुणाच्याही मागे उभा राहणारा माणूस. मिलिटरी पोलीस म्हणून सैन्यामधून निवृत्त झालेला जॅक रीचर रस्तावरून जाणार्या गाड्यांच्या चालकांना गाडीमधून पुढे सोडण्याची विनंती करत, मजल दरमजल प्रवास करत, खूप वेळ घेत दक्षिण डाकोटामधून व्हर्जिनियामध्ये आला आहे. आपले घर अशी त्याच्या मनात भावना निर्माण करणारी एकुलती एक वास्तू तिथे आहे, ११० व्या मिलिटरी पोलीस या युनिटचे मुख्यालय. खर म्हणजे इथे येण्याच त्याला खास अस काहीच कारण नव्हत, पण त्याच्या युनिटची नवीन कमान्डिंग ऑफिसर मेजर सूझन टर्नरशी तो जेव्हा फोनवर बोलला, तेव्हा त्याला तिचा आवाजच फार आवडला होता. पण तो जेव्हा तिथे पोचला. तेव्हा ती नाहीशी झालेली असते. चमत्कारिक घटना घडायला सुरूवात झालेली असते. सोळा वर्षापूर्वी घडलेल्या खुनाचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात येतो आणि त्याला पुन्हा सैन्यात भरती करून घेण्यात येते. रीचर काहीच बोलत नाही. पण सर्वच प्रकरणांचा छडा लावल्याशिवाय तो गप्प राहण शक्यच नसत.
ISBN No. | :978353175351 |
Author | :Lee Child |
Translator | :Bal Bhagvat |
Binding | :Paperback |
Pages | :418 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |