Prabuddha ( प्रबुध्द )
Prabuddha ( प्रबुध्द )
Low stock: 2 left
Author:
Publisher:
Pages: 424
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
दुष्ट रूढींच्या पायातळी एक फार मोठा समाजसमुह गाववेशीवर हजारो वर्षें पिचत पडला होता. त्या पददलित समाजाचे समर्थ नेतृत्व करणार्या एका युगपुरूषाची ही चित्तथरारक चरित्र कहाणी ! जेवढी चित्तथरारक तेवढीच हृदयद्रावक! या विदारक कहाणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सारा चरित्र चित्रपट भरलेला आणि भारलेला आहे. या चित्रपटामुळे सहृदय माणसांची मने हेलावून गेल्याशिवाय राहणार नाहीत. सत्याधिष्ठित अशा एका प्रबुध्दाच्या या चरित्रात्मक कादंबरीतील प्रत्येक घटना बोलकी आणि अंत:करणाचा ठाव घेणारी अशी आहे. गाववेशीबाहेर हजारो वर्षे पिचत पडलेल्या दलितांच्या नेत्रांतील अश्रू या काहाणीच्या पानोपानी सांडतील आणि त्यांच्या अंगात संचारलेल्या भीमबळामुळे माणसामाणसांत भेदाभेद करणारे त्या वेशींचे बंद दरवाजे कोलमडून पडतील. सारा मानवसमाज एकजिनसी बनेल... त्या खर्याखुर्या सुदिनाची ही कादंबरी सुप्रभात ठरो!
ISBN No. | :9788171610006 |
Author | :B D Kher |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :424 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |