akshardhara
Aisi Kalavalyachi Jati (ऎसी कळवळ्याची जाती)
Aisi Kalavalyachi Jati (ऎसी कळवळ्याची जाती)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ऐसी कळवळयाची जाती हा प्रा. मिलिदं जोशी यांनी रेखाटलेल्या सतरा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. शब्दांतून प्रकटलेल्या या व्यक्तींचे सुरम्य दर्शन घेताना वाचकही माझेप्रमाणे या व्यक्तींशी आत्मीय संबंध जोडतील, एवढी ही व्यक्तीचित्रे वेधक झालेली आहेत. आपल्या आतल्या दृष्टीपुढे या व्यक्ती साक्षात उभ्या राहतात. झाडांना नवी पालवी फुटते, तसे शब्दांना डोळे फुटतात. प्रा. मिलिदं जोशी यांच्या बोलण्या - वागण्यातून विधायकता, ॠजुता आणि विनम्रता यांचा त्रिवेणी संगम जसा आपणांस सहज जाणवतो, तसाच तो त्यांच्या लेखणीतूनही पाझरतो त्यांच्याशी अनौपचारिक संवाद करतानाही ते त्यांनी अनुभवलेल्या घटनांची, प्रसंगांची आणि व्यक्तींची अशी वर्णने करतात, की ती ऐकताना आपण तल्लीन होतो, हास्य आणि कारूण्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या कथनशैलीत आहे. आई, वडील आजी ही जिव्हाळयाच्या नात्यांतली माणसे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, निर्मलकुमार फउकुले, यांसारखे प्रभावी वक्ते लेखक, द.मा. मिरासदार, शिवाजी सावंत, ज्योत्स्ना देवधर, सुनीताबाई देशपांडे, ग्रेस हे ललित साहित्यकार, खेबूडकरांसारखे सिध्दहस्त गीतकार आणि द. भि. कुलकर्णी व गं. ना. जोगळेकर हे समीक्षक प्रा. मिलिदं जोशी यांच्या लेखणीचे विषय झालेले आहेत. या व्यक्तींच्या सहवासामुळे व स्पर्शामुळे त्यांचे आयुष्य जसे समृध्द झाले आहे, तसेच आपणा वाचकांचेही समृध्द झाले आहे, तसेच आपणा वाचकांचेही समृध्द होत राहील, असा मला विश्वास वाटतो.
ISBN No. | :9788174210647 |
Author | :Pra Milind Joshi |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :210 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2012 |