akshardhara
Samyak Vikas (सम्यक विकास)
Samyak Vikas (सम्यक विकास)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’विकास’ ही संकल्पना सध्या केवळ’ ’भौतिकवाढी’त अडकून बसली आहे - संकुचित झाली आहे. दरडोई उपभोग वा दरडोई जी.एन.पी. वाढवण ह्या झापडबंद रीतीनं ’विकासा’चा आलेख चढता ठेवण्याचा सध्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या मनांवरचं ह्या संकल्पनांचं गारूड इतकं बळकट आहे की, त्यांचे व्यक्ती, समाज आणि प्रर्यावरण ह्यांच्यावर होणारे भयंकर दुष्परिणाम जाणीवपूर्वक दुर्लक्षून आपण वेगानं त्याच दिशेत पुढे जात आहोत. तिकडे अर्थशास्त्राच्या मोजपट्ट्या ’विकास’ होत असल्याचं. दाखवतात; पण प्र त्यक्ष अनुभव येत आहे तो सार्वात्रिक अध:पतनाचा - सर्वांगीण विनाशाचा. अशा ह्या अशाश्वत, विकासाची कारणमीमांसा करून ख-याखु-या विकासाची दिशा शोधण्याचा हा प्रयत्न. व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्या तिन्हींची धारणा करणारा; ’भैतिक वाढी’ला असणा-या निसर्गाच्या अपरिहार्य मर्यादेचं भान ठेवून त्या मर्यादेचा आदर करणारा; जाणिवेच्या अनंत विस्ताराचा विकास अभिप्रेत असणारा असा हा ’सम्यक विकास’ आहे. संकल्पना आणि व्यवहार ह्यांची सांगड घालत त्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक.
ISBN No. | :9788174340962 |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :140 |
Language | :Marathi |
Edition | :2011/09 - 1st/ 1998 |