Nisargayan (निसर्गायण)
Nisargayan (निसर्गायण)
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी ’लढा’ देऊन त्याच्यावर ’विजय’ मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र यामुळे भेदलं जात आहे. पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनो वॄत्तीत आपल्या विचारांत. आपली भोगवादी वॄत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्य्सनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक सम-या त्याच मनोवॄत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. ही मनोवॄत्ती जोवर बदलत नाही, तोवर या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे? तो कशानं शक्य होईल? आधुनिक पाश्चत्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे. या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक.
ISBN No. | :9788174343376 |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :195 |
Language | :Marathi |
Edition | :2012/04 - 1st/1986 |