akshardhara
Adharmayuddha (अधर्मयुध्द)
Adharmayuddha (अधर्मयुध्द)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आज सारं जग त्यांना धर्मांध माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठ्या लष्करी मोहिमा आखल्या जातात. त्यांच्या हातातलं इस्लामचं निशाण पाहून किंवा त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे समज-गैरसमज पसरवले जातात. भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणार्या अशा दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळ्यांप्रमाणे नाचवणार्या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच! धर्म - अधर्माचा तात्विक काथ्याकूट न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष चितारणारी ही शोधकथा अनेकदा चीड आणते आणि तशीच अस्वस्थही करून सोडते.
ISBN No. | :9788174344496 |
Author | :Girish Kuber |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :247 |
Language | :Marathi |
Edition | :2013/03 - 5th |