Soniya Gandhi (सोनिया गांधी)
Soniya Gandhi (सोनिया गांधी)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इटलीमधील छोट्याशा खेड्यात एका मध्यमवर्गीय बांधकाम व्यावसायिकाच्या घरात लहानाची मोठी झालेली सोनिया मायनो इंग्लिश शिकायला केंब्रिजला येते अन सुरू होते एक अद्भूत प्रेमकथा. राजीव गांधी नावाचा रूबाबदार, हसतमुख राजकुमार प्रथमदर्शनी सोनियाच्या प्रेमात काय पडतो, तिला लग्नाची मागणी काय घालतो आणि भारत देश नकाशावरसुध्दा ठाऊक नसणारी सोनिया मायनो गांधी घराण्याची सून होऊन दिल्लीला येऊन काय थडकते! सगळच अविश्वसनीत! एखाद्या स्वप्नासारख! एका क्षणात सोनिया संपूर्ण भारताचा आकर्षणविषय बनते. भारतासारख्या महाकाय देशाचा गुंतागुंतीचा कारभार तिच्या घरुन चालवला जात असतो. या देशाच्या कर्त्याकरवित्या इंदिरा गांधी तिच्या सासूबाई. जगभरचे राजकारणी तिच्या घरी पायधूळ झाडत असतात. सोनियाच्या पूर्वायुष्याची सगळी परिमाणच बदलून जातात. स्वप्नातही कल्पना केली नसेल, अस वलयांकित जीवन ती जगू लागते. पण या वलयाला असते राजकीय अस्थिरतेची काळी किनार बांगला देशच युध्द, आणीबाणी, इंदिरा गांधीचा निवडणुकीतील पराभव आणि पुनश्च सत्ताग्रहण, सुवर्णमंदिरावरील कारवाई, त्यातून घडलेली इंदिराजींची हत्या, राजीवचा राजकारणात प्रवेश, तामीळ वाघांच्या दहशती कारवाया आणि अंतिमत: राजीच गांधीची हत्या!
ISBN No. | :9788174347909 |
Author | :Peter Hurn |
Translator | :Savita Damle |
Binding | :Paperback |
Pages | :515 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |