Panyache Pankh ( पाण्याचे पंख )
Panyache Pankh ( पाण्याचे पंख )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
डोह आणि सोन्याचा पिंपळ यांनतर प्रसिद्ध होणारा पाण्याचे पंख हा श्रीनिवास कुलकर्णी यांच्या ललित लेखनाचा तिसरा संग्रह आहे. अनुभवाच्या सूक्ष्म छटा टिपणारी नितळ संवेदनशीलता हा कुलकर्णी यांच्या ललित लेखनाचा स्वभावधर्म आहे. काही तरी अपरिहार्यपणे, सहजपणे रुजून येते आहे, उगवते आहे असा उत्कट प्रत्यय कुलकर्णी यांचे लेखन वाचीत असताना सतत येत राहतो. तरल इंद्रियसंवेदना असोत किंवा मनाच्या कोमल हालचाली असोत, त्यांचे अविकृत प्रतिबिंब त्यांच्या या लेखनात विस्मयाचा अनुभव देत उमटत राहते. खोल समजूतदारपणातून येणारी नम्रता लेखकांच्या अनुभवविश्वात भरून राहिली आहे. त्यामुळे, काहीतरी विशेष मोलाचे सांगण्याचा आविर्भाव कुठेही नसलेले हे लेखन खूप काही सांगून जाते. हळुवार काव्यात्मता या लेखनात इतकी अंगभूत आहे की, भाषा काव्यमय करण्याचा जराही प्रयत्न कुठे जाणवत नाही.
ISBN No. | :9788174862495 |
Author | :Shrinivas V Kulkarni |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :paperback |
Pages | :123 |
Language | :Marathi |
Edition | :1st 1987/ 3rd 2022 |