Skip to product information
1 of 2

akshardhara

Abhayaranya (अभयारण्य)

Abhayaranya (अभयारण्य)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’बहुरत्ना वसुंधरा’ हे पॄथ्वीचे वर्णन खूप काही सांगून जाते. ही रत्ने केवळ सोने, हिरे, मोती यांच्या स्वरुपात नसून जीवसॄष्टीला पोषक अशा पर्यावरणाच्या रुपात पाहिली पाहिजेत. सूर्याभोवती फिरणा-या नवग्रहांत एकटया पॄथ्वीला ही देणगी मिळालेली आहॆ. विविध अंतराळ्यानांनी इतर ग्रहांची आणलेली माहिती काय दर्शवते? आपल्यासारखी जीवसॄष्टी नांदवू शकणारे वातावरण त्यांच्याकडे नाही. आपल्या गरजाही लाडावलेल्या मुलासारख्या आहेत. तापमान पन्नास अंशाला जाऊन भिडले की उष्म्याचा कहर उडतो; आणि शून्याखाली काही अंश गेले की उलटा त्रास! त्या तुलनेत चंद्रावर तापमान सूर्यास्त झाला की ताशी १५० अंश इतक्या भरभर घसरते. श्वास घ्यायला तिथे वातावरणाच नाही. तर शुक्रावरचे वातावरण जीव घेणारे! थोडक्यात, आपण टिपला निघावे आणि इतर ठिकाणे पाहून आपले घर बरे म्ह्णून परतावे तसे विश्वाचे मर्यादित कां होईना, पण दर्शन घेतले की पॄथ्वीचे महत्व कळते. पण कळ्णे आणि बोध घेणे ह्यांत फरक आहे. तंत्रज्ञानाचा अविचारपूर्वक केलेला वापर, आपले रक्षण करणारे ओझोनचे कवच भेदले जात आहे त्याबद्दलची उदासीनता, आपले मर्यादित हितसंबंध जपण्यासाठी संपूर्ण जीवसॄष्टीला मारक ठरणा-या अण्वस्रांची वाढ आदी गोष्टी काय दर्शवतात? ’वसुधैव कुटुम्बकम’ हे तथ्य कळले असले तरी अदयाप आपल्या आचरणात रुजलेले नाही. उलट, हे कुटुंब नांदू नये अशा वसुधेला आणून सोडायची बेपर्वाईच दिसून येते. अशा चिंतेतून अभयारण्य ही काल्पनिक उद्भवली एवढे म्हटले तरी पुरे.’

ISBN No. :9788174866905
Author :Jayant Narlikar
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paper Bag
Pages :96
Language :Marathi
Edition :2010/07 - 1st/2002
View full details