Sadha Manus ( साधा माणूस )
Sadha Manus ( साधा माणूस )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हे आयुष्य मी कसे उपयोजिले, उधळले, अगर सार्थकी लावले, याचा प्रामाणिक आढावा आज घेणे उपयुक्त ठरावे.. या प्रदीर्घ प्रवासात हवे ते मिळाले का, नको वाटले ते टाळले का, चालता चालता जे गोळा केले गेले, झाले, ते सुखद झाले का, याचाही विचार मनात येतो.. अभिजात नट, प्रथितयश नाटककार, लेखक, गायक, कवी, निष्णात सर्जन, साधा माणूस आणि थोर सेनानी यांच्या प्रत्यक्ष परिचयाने, सहवासाने आणि काहींच्या अगत्याने माझे जीवन समृद्ध आहे. शुद्ध प्रेम कधीही न करता प्रेमावर व्याख्याने झोडणारे ऐकले पोथ्या उलथ्यापालथ्या करून देव दिसल्याचा दावा करणारेही दिसले. पैसा व प्रतिष्ठा यांसाठी देशभक्तीचा धंदा करणारे ठोक आणि किरकोळ व्यापारी पाहावे लागले... मुंबईच्या महापौरापासून दिल्लीच्या देवापर्यंत दोस्ती आशयाचा खोटा दावा करणाऱ्या संधिसाधूंची अधेमधे गाठ पडत होती... चिकणी सुपारी चघळणाऱ्याप्रमाणे देवाचे नाव श्रद्धेविना चघळणाऱ्या भोंदू साधुंचीही भेट घडली.... तसे काहीही ना बोलता स्वतःच्या सर्वस्वाचा हसत होम करणारे काही क्रांतिकारही जवळून पाहण्याचे भाग्य लाभले... विश्वाच्या भल्याकरताच आत्मचिंतनातं मग्न झालेल्या काही महापुरुषांचे दुर्मिळ दर्शन घडले...
ISBN No. | :9788174867117 |
Author | :Bhalaji Pendharkar |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :paperback |
Pages | :242 |
Language | :Marathi |
Edition | :1st 1993/ 5th 2023 |