Jhumbar (झुंबर)
Jhumbar (झुंबर)
Share
Author:
Publisher:
Pages: 151
Edition: Latest
Binding: Peparback
Language:Marathi
Translator:
प्रकाश नारायण संत यांनी ‘झुंबर’ या संग्रहाची जुळवाजुळव करून ठेवली होती. लंपनच्या वडिलांचा अकस्मात मृत्यू होतो आणि लंपनचे सगळे भावविश्व कोलमडते - या अनुभवावर त्यांना कथा लिहायची होती. ती लिहून होण्याची ते वाट पाहत होते. ती लिहून हा संग्रह प्रसिध्दीसाठी द्यायचा त्यांचा मानस होता. प्रकाश नारायण संत यांचे १५ जुलै २००३ या दिवशी, चटका लावणारे आकस्मिक निधन झाले. लंपनच्या वडिलांच्या मृत्यूची कथा लिहून झाली नाही तरी त्या अनुभवाच्या पुढे जाऊन, लंपनच्या मनात निर्माण झालेले वडिलांविषयीचे आर्त व्यक्त करणारी ‘स्पर्श’ ही कथा त्यांनी लिहिली होती. ती या संग्रहात समाविष्ट केली आहे. हा संग्रह वाचून, प्रकाश नारायण संत यांचे नवे लेखन इत:पर वाचायला मिळणार नाही याची हुरहूर निश्र्चितच मनात भरून राहील!
ISBN No. | :9788174867551 |
Author | :Prakash Narayan Sant |
Publisher | :Mouj Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :151 |
Language | :Marathi |
Edition | :2012/03/01 - 8th/2004 |