Vidushak (विदूषक )
Vidushak (विदूषक )
Low stock: 1 left
Author: Mangesh Padgaonkar
Publisher: Mouj Prakashan Gruh
Pages: 94
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आधुनिक मराठी कवितेच्या जरिपटक्याचा अधिकार असलेल्या आजच्या प्रमुख कवींत मंगेश पाडगावकरांची निर्विवाद गणना होते. ’धारानॄत्या’पासून आपल्या प्रत्येक कवितासंग्रहात पाडगावकरांनी काव्यक्षेत्रामध्ये नित्य नवी मुलुखगिरी केली आहे. अनुभूतीचे नवनवे प्रांत शोधावे, नवनव्या भाववॄत्तींचा वेध घ्यावा, आणि भाषेतील नवनव्या शक्ती वापरून भावार्थांची अभिनव लेणी खोदावी, असा त्यांच्या समर्थ प्रतिभेला सतत हव्यास आहे. ’विदूषक’मध्ये त्यांच्या नित्य विकासशील व्यक्तिमत्त्वाचे एक वेगळेच, कदाचित धक्का देणारेही, पण अतिशय वेधक दर्शन घडते. मुख्यत: निसर्गसौंदर्याच्या व प्रीतिभावनेच्या तरल, स्वप्निल प्रत्ययात आजवर रंगलेली त्यांचई आत्मलीन वॄत्ती भोवतीच्या सामाजिक वास्तवाकडे धिटाईने, पापणी जागी ठेवून, पाहू लागली आहे. ’विदूषका’च्या या अंतर्भेदी व प्रखर तॄतीय नेत्रापुढे सामाजिक वास्तवाचे फुसलावणारे कॄत्रिम रंग वितळतात; सफाईने काढलेले सोंग टराटर फाटते; कमावलेले चंद्रबळ लटपटते. उरते केवळ उघडेवाघडे आत्म-स्वरूप: विसंगतिपूर्ण, हास्यास्पद, एकाकी, बिभिस्त, आणि केविलवाणॆ. आणि मग उपहासाने कधी विडंबने वठवणारा, कधी उपरोधाने खदाखदा हसणारा, तर आणखी कधी रागाने धुमसत विरूप दाखवणारा तो मुखवटा अचानक हळवा भासतो. त्याचे जळणारे डोळे एकाएकी जसे काही भरून येतात. त्याच्या अट्टहास्यामधून कसल्यातरी खोल व्यथेचे क्रंदन ऎकू येते. एकाच वेळी विकट व आर्त अशा य अनुभवाचे आवहन जसे जबरे, तसे त्याच्या भाषेतील आविष्काराचे आव्हान बिकट. पाडगावकरांनी धौर्याने ते स्वीकारले आहे. आता गदयाचा स्वर व बोलीची लय पकडीत त्यांची कविता समरतपणे आकारते. या नव्या वाटेवरील त्यांच्या टप्प्याबद्दल अपेक्षा वाढवणारा ’विदूषक’ हा पाडगावकरांचा आठवा संग्रह अहे.
ISBN No. | :9788174867797 |
Author | :Mangesh Padgaonkar |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :2008/10 - 1st/1993 |