Purniya (पूर्णिया)
Purniya (पूर्णिया)
Low stock: 5 left
Author:
Publisher:
Pages: 66
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ही नुसती बिहारची हकीकत नाही. सगळ्या उत्तर भारताची, खरं तर आपणा सगळ्यांची आहे. काही करता येईल का? निसर्ग आणि गरीब यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य करता येईल का? यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास झाला, असं म्हणूयात का आपण? शहराकडे धावणारे असहाय माणसांचे लोंढे हे प्रगतीचे लक्षण मानायचे की कसले? हे सगळे प्रश्र्न या पुस्तकाने माझ्या समोर उभे केले. ते या पिढीला वाचकांपुढेही उभे राहिले, तर मी समजेन, चला, अजून आशेला जागा आहे. - अनिल अवचट अनिल अवचटांचे हे लेखन म्हणजे पूर्णिया जिल्ह्याची परिचय-पुस्तिका नव्हे. एका समाजवादी निष्ठेच्या तरुणाची, प्रतिकारशून्य सामाजिक गुलामगिरीच्या समाजरचनेविषयीची ही प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया उव्देग आणि विस्मय ह्यांनी भरलेली असणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्यानंतर दोन दशकांनीसुध्दा सारे जीवन लाचारी व गुलामीचे शेवाळ चढल्यामुळे इतके अभद्र व भेसूर असावे ह्याचा विस्मय आणि जीवनाविषयीची चीड अजूनही तीव्र नसावी ह्याचा उव्देग. बिहारच्या चिरवंचित माणसाचे हे ओझरते दर्शन आहे. बिहारच्या सामान्य माणसाइतका दुर्दैवी माणूस भारतात दुसरा कोणी असेलसे वाटत नाही. बिहारइतके दारिद्र्य भारतात अनेक ठिकाणी दाखवता येईल. भयानक दारिद्र्य ही काही एकट्या बिहारची कहाणी नव्हे. ती कमीअधिक प्रमाणात सर्व प्रांतांतील मागासलेल्या भागांची जवळजवळ सारखी कहाणी आहे. महाराष्ट्रासारख्या प्रांतातही आदिवासीच्या जीवनाचे दारिद्र्य ह्याहून तत्वत: निराळे नाही. पण दारिद्र्य आणि दुर्दैव ह्यांचा जो संगम बिहारमध्ये साकार झाला आहे, त्याला भारतात दुसरीकडे तोड सापडणे कठीण आहे. हे दुर्दैव जर नीट समजून घेतले तर इरसाल अप्रामाणिक वजा जाता इतर कुणाचाही भ्रमनिरास झाल्याविना राहणार नाही. - नरहर कुरुंदकर
ISBN No. | :9788174868442 |
Author | :Anil Awachat |
Publisher | :Mauj Prakashan Gruha |
Binding | :Paperback |
Pages | :66 |
Language | :Marathi |
Edition | :2012 - 7th/1969 |