Skip to product information
1 of 2

Vyakti Aani Valli (व्यक्ती आणि वल्ली)

Vyakti Aani Valli (व्यक्ती आणि वल्ली)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 202

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

देशपांड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्‍हातर्‍हा धुंडाळल्या - आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात - चांगल्यावाइटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात ! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ती आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्त्व आहे. त्यांतील बर्‍यावाइटाचे अंतर्नाट्य देशपांड्यांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्याआमच्यांत आहे - आणि लेखकातही! अशा या वीस व्यक्ती आणि वल्ली.

  

ISBN No. :9788174868985
Author :P L Deshpande
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :202
Language :Marathi
Edition :Latest
View full details