Gahan Padleli Tekadi (गहाण पडलेली टेकडी)
Gahan Padleli Tekadi (गहाण पडलेली टेकडी)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इतिहास हा नेहमी प्रमुख अशा महत्त्वाच्या व्यक्तींचाच लिहिला जातो. समकालीन घटनांची इतिवृत्तंही आपल्या वाचनात येतात, तेव्हा घटनांच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तींची मत, त्यांच्या कृती यांच्याबद्दलच आपल्याला माहिती मिळत राहते; परंतु अशा ऎतिहासिक किंवा समकालीन घटनांमध्ये त्या घटना ज्यांच्या आयुष्यांशी निगडित असतात, त्या सामान्य माणसांबद्दल आपल्याला विशेष अशी कुठलीच माहिती मिळत नाही.मिळते ती अधिकृत माहिती. ती माणस स्वत: आपल्याशी बोलतच नाहीत. जणू त्यांच महत्त्व नगण्य असत. खरतर जे घडत त्यात त्यांचा मोठा वाटा असतो. या संग्रहात मात्र स्लोव्हेनियामधून भारतात ख्रिश्चन साध्वी म्हणून आलेल्या मारिजा स्त्रेस यांनी आपल्या प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारावर चितारलेल्या साबरकांठा (गुजरात) मधील सामान्य आदिवासी स्त्रियांच्याच कहाण्या संग्रहित केल्या आहेत. या स्त्रियाच कहाण्यांच्या केंद्रबिंदू आहेत. त्यांच्यावर झालेल्या अन्यायांच्या भीषण चित्रांबरोबरच त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागृत झाल्यावर त्या त्यांच आयुष्य कस बदलत आहेत, याचही चित्रण आहे.
ISBN No. | :9788177660319 |
Author | :Marija Sres |
Translator | :Anjali Narvane |
Binding | :Paperback |
Pages | :166 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |