Diary of Anne Frank-(डायरी ऑफ अॅन फ्रॅंक)
Diary of Anne Frank-(डायरी ऑफ अॅन फ्रॅंक)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका तेरा वर्षीय मुलीची अनुभव-गाथा वाचताना;डोळ्यांत टिपूसही येणार नाही ,अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.दुसर्या महयुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा जो छळ झाला,त्यातील अघोरी अनुभव वाट्याला आलेली ही बालिका.अॅनच्या मृत्यूनंतर तिची डायरी वडिलांच्या हाती आली आणि १९४७ साली ती जेव्हा प्रसिद्ध झाली;तेव्हा तिचे वाङमयीन आगळेपण वाचकांच्या तात्काळ ध्यानात आले.महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल झाले होते,वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनएपायी इतरांचा अमानुष छळ करण्यासाठी मनुष्य कसा प्रवृत्त होतो,याचे प्रत्ययकारी चित्रण तर या डायरीत आहेच;पण एका उमलत्या कळीच्या भावभावनांना तिने आपल्या लेखनात यथेच्छ,कोणताहई आडपडदा न ठेवता,वाट मोकळी करून दिली आहे."मला मृत्यूनंतरही जगायचे आहे,आणि म्हणून देवाने दिलेल्या या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे" असे तिने लिहिले.ही देवाची देणगी;म्हण्जे तिच्यात वसणाऱ्या सर्व भावभावनांना शब्दांत पकडण्याचे सामर्थ्य.
ISBN No. | :9788177661422 |
Author | :Anne Frank |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Mangala Nigudkar |
Binding | :Paperback |
Pages | :267 |
Language | :Marathi |
Edition | :6th/2011 - 1st/1988 |