Resheemaregha (रेशीमरेघा)
Resheemaregha (रेशीमरेघा)
Low stock: 1 left
Author:
Publisher:
Pages: 79
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कवयित्री म्हणून सर्वपरिचित असलेल्या शान्ताबाईंनी विपुल गीतलेखनही केले आहे. चित्रपट, नाटके याचप्रमाणे ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती अशा माध्यमांतून त्यांची अनेक गीते लोकांपर्यंत पोहोचली आणि ती लोकप्रियही झाली. शान्ताबाई या आजच्या एक आघाडीच्या गीतकार आहेत. गीतांसाठी विविध रचनाबंध त्यांनी हाताळले आहेत, त्याचप्रमाणे आशयाचीही त्यात विस्मयकारक विविधता आहे. लावण्या आणि गौळणी या पूर्वापार चालत आलेल्या गीतप्रकारांत शान्ताबाईंनी अनेक गीते लिहिली, इतकेच नव्हे तर त्या प्रकारांना त्यांनी स्वत:चे असे एक परिमाणही दिले. ‘रेशीमरेघा’ या संकलनात शान्ताबाईंनी लिहिलेल्या अनेक लावण्या, गौळणी आहेत, तसेच त्यांत काही वेधक दंव्दगीतेही आहेत. व्यावसायिकतेला झालेला निर्मितीक्षमतेचा स्पर्श आणि कारागिरीला लाभलेली काव्यगुणांची जोड म्हणजेच या प्रसन्न ‘रेशीमरेघा’.
ISBN No. | :9788177662276 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :79 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |