The Joy of Cancer (द जॉय ऑफ कॅन्सर)
The Joy of Cancer (द जॉय ऑफ कॅन्सर)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कॅन्सरसारख्या रोगाशी लढणं सोपं नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कॅन्सरचं निदान होतं, तेव्हा त्या व्यक्तीची आणि कुटुंबीयांची काय अवस्था होते, या रोगाचे आर्थिक, कौटुंबिक परिणाम कसे होतात, त्या रोगावर कोणते उपचार केले जातात, उपचारांदरम्यान त्या रोग्याची मानसिक, शारीरिक स्थिती काय असते आणि या रोगाला धीरादात्तपणे कसे सामोरे जावे याची माहिती देणारं पुस्तक आहे, ‘द जॉय ऑफ कॅन्सर.’ अनुपकुमार यांच्या स्वानुभवातून साकारलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी कर्करोगाशी लढण्याचा सातकलमी कार्यक्रम सांगितला आहे. पहिल्या कलमात कर्करोगाचा स्वीकार कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. दुसर्या कलमात तुम्ही तुमचे उपचार आणि डॉक्टर कसे निवडाल हे सांगितले आहे. तिसर्या कलमात सकारात्मकतेची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. चौथ्या कलमात कुटुंबाच्या, स्नेह्यांच्या आधाराची मांडणी कशी करावी, हे सांगितलं आहे. पाचव्या कलमात उर्वरित आयुष्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, याबद्दल लिहिले आहे. आरोग्याकडे नेणारा मार्ग मन:चक्षूने कसा पाहावा, हे सहाव्या कलमात सांगितले आहे आणि सातव्या कलमात आहार नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले आहे. सगळ्या उपचारांनंतर त्यांना जेव्हा बरं वाटू लागलं त्यानंतरचं त्यांचं जीवन, कॅन्सर परत उद्भवला तेव्हाही त्यांनी त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं, याबद्दलही त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. या पुस्तकाच्या शेवटी नोंदवलेल्या परिशिष्टामध्ये त्यांनी कर्करोग म्हणजे काय, कर्करोग कशामुळे होतो, कर्करोगाचे प्रकार, कर्करोगाच्या खुणा आणि लक्षणे, कर्करोगावरील उपचार, उपचारांचे आनुषंगिक परिणाम, उपचार चालू असताना घ्यावयाची दक्षता, भविष्यातील कर्करोग उपचार काय असतील याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच विविध कर्करोग संस्था आणि त्यांच्याकडून मिळणार्या मदतीचे स्वरूप याविषयी माहिती दिली आहे. कर्करोगाशी संबंधित इंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थ समाविष्ट केले आहेत.
View full details
ISBN No. | :9788177664348 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Madhuri Shanbag |
Binding | :Paperback |
Pages | :188 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |