Speedpost (स्पीडपोस्ट)
Speedpost (स्पीडपोस्ट)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आई आणि मुलांमधला रक्तबंध आदिम... शरीराने आणि मनानेही काळजाशी घट्ट बांधलेला! सुंदर, निरामय जीवनमूल्यांना पैशांचा दावणीशी बांधून मानवी नात्यांमधला प्राणच शोषू पाहाणा-या आधुनिक अर्थसत्तेने आई मुलांच्या नात्याला नवं परिणाम दिलं आहे... हादरे आणि आव्हानही दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम लेखिका शोभा डे यांनी आधुनिकतेच्या झंझावात जगणा-या आपल्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रं... जगातल्या कुठल्याही आईला तिचीच वाटतील अशी! गोंधळून टाकणा-या, जीवघेण्या स्पर्धेत लोटून उदध्वस्त करणा-या दुनियेशी टक्कर देणं अपरिहार्यच बनलेल्या आपल्या मुलांसाठी कुणाही आईचं काळीज तुटावं, अशा प्रत्येक विषयाची चर्चा या पत्रांमध्ये आहे- कुटुंबाची चौकट, परस्परांमधल्या नात्यांचे बंध, कौटुंबिक संस्कॄती, परंपरा आणि नीतीमूल्यांचा आग्रह... कठोर शिस्त आणि सारंच झुगारून देणारी बंडखोरी... तासन तास चालणारे टेलिफोन कॉल्स आणि लठ्ठ बिलांवरून घरात होणा-या हाणामा-या... मध्यरात्रीपर्यंत चालणा-या पाटर्या आणि इंटरनेटवरचं चॅटींग... वयात येतानाच्या काळज्या, कोवळया वयातलं प्रेम, झपाटून टाकणारं शारीरिक संबंधाचा तिढा! देश...देव...धर्म... सामाजिक जबाबदा-या आणि नागरिकत्वाचं भान!- असे किती विषय आणि कितीतरी प्रसंग!! अपरंपार प्रेमाने ओथंबलेली, मायेने जवळ घेणारी, कधी पाठीत धपाटे घालणारी, चिडवणारी, टिंगल करणारी तर कधी धारेवर धरणारी, मनसोक्त हसवणारी आणि हसता हसता अचानक डोळयात पाणी उभं करणारी ही सुंदर पत्रं... ’जगण्या’साठी आसुरलेल्या प्रत्येक मनाला स्पर्शून जातील.
ISBN No. | :9788177664409 |
Author | :Shobha De |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Aparna Velanakar |
Binding | :Paperback |
Pages | :368 |
Language | :Marathi |
Edition | :2013/02 - 1st/2004 |