Karmachari (कर्मचारी)
Karmachari (कर्मचारी)
Share
Author: V. P. Kale
Publisher: Mehta Publishing House
Pages: 176
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तुम्ही दुधाच्या, रेशनच्या,साखरेच्या,तिकिटांच्या, बसच्या रांगेत तासन् तास उभे राहता. चालती गाडी पकडता. लोकलला लोंबकळता. लेटमार्क चुकवण्यासाठी जीव गहाण टाकता. साहेबाची बोलणी खाता. कॅंटिनचा बेचव चहा पिता. संसारात तर नाना आपत्ती सहन करता. आज हे नाही. उद्या ते नाही. मोर्चा, हरताळ, संचारबंदी, उपोषण सगळं हलाहल पचवता. तरीही तुम्ही हसता. हसवता. गाडीत उभ्या उभ्या पत्ते खेळता. राजकारणावर हिरिरीने बोलता. एखाद्याला मोरु बनवून आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करता. बेचव चहाच्या पैजेवरही खुष होता. यू आर सिम्पली ग्रेट ! असे तुम्ही जातिवंत.कर्मचारी हा कथासंग्रह म्हणायचा नाही, पण ते काही खरं नाही. हा आहे आरसा. सर्वांना प्रेम करायला लावणारा आरसा. उद्या रिटायर्ड होणारा हेडक्लार्क पण लिफ्ट मजल्यावर जाता जाता तिथल्या आरशात डोकावतो. तसाच हा आरसा.
ISBN No. | :9788177664812 |
Author | :V P Kale |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :172 |
Language | :Marathi |
Edition | :2013/02 - 1st/1973 |