Skip to product information
1 of 2

akshardhara

Goshti Manasanchya (गोष्टी माणसांच्या)

Goshti Manasanchya (गोष्टी माणसांच्या)

Regular price Rs.140.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.140.00
-30% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sudha Murty

Publisher: Mehta Publishing House

Pages: 166

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Leena sohani

तुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर...? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर...? सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजक कथांमधून या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती...प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणार्‍या लेखिका! या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे... एक नवा व्यवसाय सुरू करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे... ‘मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृध्द कर,’ असं वचन आपल्या नातीकडून घेणार्‍या, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्ट्सुध्दा यात आहे. या गोष्टी हसवणार्‍या, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपली स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते. 

ISBN No. :9788177665000
Author :Sudha Murty
Publisher :Mehta Publishing House
Translator :Leena Sohoni
Binding :Paperback
Pages :166
Language :Marathi
Edition :Latest
View full details