akshardhara
Khekada (खेकडा)
Khekada (खेकडा)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 116
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
‘खेकडा’ या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो, कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत. जसे ‘तुमची गोष्ट’ आरंभीच लेखक सांगतो, ‘ही तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी’ आणि शेवटीही निक्षून सांगतो, ‘तुमची म्हणून सांगितलिली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच.’ पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे, त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता. रत्नाकर मतकरी हे एक सिध्दहस्त कथाकार आहेत आणि या कथासंग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अशा आहेत. या कथांचे अन्य भाषांतून अनुवाद झाले तर ते फक्त मतकरींचेच प्राप्त यश वृध्दिंगत करतील असे नव्हे, तर परिणामी मराठी भाषेलाही ललामभूत ठरतील.
ISBN No. | :9788177665505 |
Author | :Ratnakar Matkari |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :116 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |