Gharbhinti (घरभिंती)
Gharbhinti (घरभिंती)
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मराठी साहित्याचा मोलाचा ठेवा ठरावा, अशी ही साहित्यकृती! आजच्या जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातही महाभारतसदृश संघर्षपूर्ण घटना केवळ अस्तित्वासाठी घडत असतात, याचे वास्तवपूर्ण, भेदक दर्शन म्हणजे घरभिंती. ग्रामीण समाजाच्या सर्वसाधारण स्तरातील कुटुंबाची ही प्रातिनिधिक तरीही वैशिष्ट्यपूर्ण कहाणी. जन्मप्राप्त, अटळ, जीवघेण्या आर्थिक हलाखीचा चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्यासाठी केवळ काही शैक्षणिक सुविधांच्या तुटपुंज्या आधारावर एका तरुण, संवेदनशील मनाने दिलेला निकराचा पण यशस्वी लढा, हा या घरभिंतीचा गाभा! ‘झोंबी’ ते ‘घरभिंती’ या प्रवासपटातून प्रभावीपणे ग्रामीण जीवनाचे उभेआडवे ताणेबाणे प्रथमच त्यांतील खऱ्या छेदाभेदासकट विस्तृत प्रमाणात साहित्यरूपाने साकार होतात. त्यामुळे अंतर्बाह्य विस्तृतपणे वेध घेणारी ही आत्मचरित्रकथा ग्रामीण साहित्याच्या उद्याच्या प्रवासाची अचूक दिशा प्रभावीपणे दाखविते. – गो. म. कुलकर्णी
ISBN No. | :9788177665932 |
Author | :Anand Yadav |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :545 |
Language | :Marathi |
Edition | :7th/2014 - 1st/1992 |