Pandhare Dhag (पांढरे ढग)
Pandhare Dhag (पांढरे ढग)
Share
Author:
Publisher:
Pages: 178
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
या शतकात झालेली दोन महायुद्धे, हे दोन ऎतिहासिक टप्पे आहेत. या दोन टप्प्यांवर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात प्रचंड स्थित्यंतरे घडून आली.ही स्थित्यंतरे भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रातही घडत होती. दुसर्या महायुद्धाच्या दरम्याने ध्येयप्रवण तरुणांची एक पिढी इथे वावरत होती. पहिल्या महायुद्धाच्या दरम्याने जन्मलेली, सुरवातीला टिळ्कांचे आणि नंतर गांधींचे संस्कार घेऊन वाढणारी ही पिढी. आपल्या भोवतालच्या कौटुंबिक आणि आर्थिक पाशांना न जुमानता ही पिढी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत होती. हे ध्येय केवल स्वातंत्र्यप्राप्तीचे नव्ह्ते....अभय हा अशाच ध्येयप्रवण तरुण पिढीचा प्रतिनिधी आहे. मानवी जीवनाची जगण्यासाठीची धडपड, उकिरड्यावरच्या बेवारशी पोराप्रामाणे त्यांची असणारी अवस्था पाहून तो क्रांतीच्या दिशेने पावले उचलू लागतो. एका बाजूला सत्चशून्य व ध्येयशून्य होत चाललेल्या महाराष्ट्रातील उच्च् मध्यमवर्गाच्या पार्श्र्वभूमीवर, कनिष्ठ मध्यमवर्गातल्या बुद्धिमान आणि भावनाशील अशा तरुणांचा प्रतिनिधी म्हणून अभय उभा आहे. हा अभय वाचकांना नक्कीच ओळ्खीचा वाटेल.
ISBN No. | :9788177667219 |
Author | :V S Khandekar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :178 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |