Mayabazar (मायाबाजार)
Mayabazar (मायाबाजार)
Share
Author: V. P. Kale
Publisher: Mehta Publishing House
Pages: 136
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
वपुंच्या कथाविश्र्वात मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या ‘असामान्य’ सुखदु:खांना उद्गार देणार्या या कथा आहेत. हलक्याफुलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान ‘वपुं’च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी ‘आचरट’ होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणार्या, हसवणार्या रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा ‘स्वस्त रंजकते’ला थारा देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्र्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्र्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामर्थ्य ‘वपुं’च्या कथेत आहे. - प्रा. सदा कर्हाडे(‘ललित’ - जुलै,१९७६)
ISBN No. | :9788177668957 |
Author | :V P Kale |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :132 |
Language | :Marathi |
Edition | :2012/11 - 1st/1977 |