Dhirubhai Ambani ( धीरूभाई अंबानी )
Dhirubhai Ambani ( धीरूभाई अंबानी )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
उद्योग व्यवसायाची कुठलीही परंपरा नसताना किंवा उद्योगासाठी लागणारे व्यावसायिक शिक्षण नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर आपला स्वत:चा उद्योग सुरू करून यशाचे एव्हरेस्ट गाठणारे धीरूभाई अंबानी यांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तिदायक आहे.
अगदी सुरुवातीला ज्या मुंबईने त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारे काम दिले नाही त्याच मुंबईत धीरूभाईंनी आपले उद्योगसाम्राज्य उभे केले. एकानंतर एक नवे उद्योग सुरू करताना आपल्या उद्योगांचे इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याची एक नवी पध्दत त्यांनी सुरू केली.
केवळ जिद्दीच्या जोरावर आपली सारी स्वप्ने पूर्ण करणार्या धीरूभाईंची जीवनकथा खूप काही सांगणारी रोमांचक आणि अदभुत आहे.
शून्यातून विश्व उभे करताना करावे लागनारे प्रयत्न, त्यासाठी लागनारा विचार आणि खंबीर मनोवृत्ती हे समजून घेण्यासाठी धीरूभाईम्चे चरित्र वाचायलाच हवे. आपल्या यशात सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना सामील करून घेण्याची त्यांची कल्पकताही थक्क करून सोडणारी आहे.
ISBN No. | :9788177865103 |
Author | :Ravindra Kolhe |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :128 |
Language | :Marathi |
Edition | :2009 |