Aanandi Kasa Jagava (आनंदी कसं जगावं)
Aanandi Kasa Jagava (आनंदी कसं जगावं)
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपला आहार, व्यायाम, दररोज वागणे आणि आपली योगसाधना या सर्वांचई नीट सांगड घातली तर जगणे चांगली आनंदयात्रा होई शकते. याकरिता आपणास स्वत:त बदल करावा लागतो. सुरुवारतही स्वत:व करावी लागते आणि नंतर त्यात सातत्य ठेवावे लागते. आपले शरीर हे परमेश्वर म्हणा किंवा निसर्गाने दिलेले म्हणा, एक अनमोल स्वयंचलित यंत्र आहे. त्याची सव्हिसिंग करणे, निगा राखणे, ते पुन्हा फार बिघडणार नाही, याची काळजी घेणे जमले की, बराचसा प्रवास सुकर होतो. जगताना सकारात्मक जबाबदारीची भावनाच मनाला सावरते. मीपणाचे अन अहंकार बुरूज ढासळू लागतात. भूतभविष्यात रमणारे मन फक्त वर्तमानाशी जोडले जाते. यातून मग शरीर आणि मनाचा सुसंवाद वाढत जातो. आणि आनंदी जगण्याचा आपला मार्ग आपणच शोधू लागतो. बाबा भांड हे एक प्रयोगशील लेखक आणि प्रकाशक आहेत. अनेक वर्षे ते शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी स्वत:वर प्रयोग करून अनुभव घेत आहेत. लेखनव्यवहाराबरोबर शरीर आणि मनाच्या आरोग्याचे महत्व त्यांनी या अनुभवाने ओळखले आहे. शरीर-मनाच्या स्वस्थासाठी सजग असलेल्यांना त्यांनी या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी करून बघण्यासारख्या आणि स्वत: एकदा अनुभवण्यासारख्या आहेत.
ISBN No. | :9788177865288 |
Author | :Baba Bhand |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2012 - 1st/2010 |