akshardhara
Nirogi Rahayacha Shivambu Ghya! Yoga Kara!
Nirogi Rahayacha Shivambu Ghya! Yoga Kara!
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तुमच्याकडं सगळं आहे, नसेल तर तुम्हाला ते हवं आहे. सत्ता, संपत्ती, अधिकार आणि सौख्य मिळवण्यासाठी काहीही करण्याची तुमची तयारी आहे. यावेळी तुम्ही शरीराची चिंता करीत नाही, मनाची काळजी करीत नाही, तुम्हाला काळ्जी असते उदयाच्या अस्थिरतेची तुम्ही दुस-याची, समाजाची, देशाची आणि जगाचीसुद्धा चिंता करता. पण तुमच्या शरीराची-मनाची काळ्जी घेणं गरजेचं वाटत नाही यावर तुम्ही सांगता, मला वेळ नाही. मग गाडी येते, सत्ता-संपत्ती, अधिकारांची झूलही येते, आणि शांती समाधानाची झोप मात्र हरवून जाते. सगळयांचं हे असंच असतं, कमी_अधिक असेल पण नक्की घडतच असतं. शरीर-मन पोखरलं जातं, आम्लपित्त, मधुमेह, मलावरोध, रक्तदाब, श्वसनांच्या विकारासोबत हदयविकारापर्यंत प्रवास कधी झाला कळतच नाही. हे सगळं वरील ताणतणावांचं बायप्रॉडक्ट! कदाचित तुमचा वरील्स आजारांच्या प्रवास सुरू झाला नसेलही तरी यापुढील आयुष्य आनंदी निरोगी जगण्यासाठी एस. एस. वाय. पद्धतीची योगसाधना आणि प्राचीन भारतीय शिवांबू, अर्थात स्वमूत्र चिकित्सा हा शरीर-मनाच्या आरोग्य रक्षणाचा एक मार्ग आहे. बाबा भांड हे प्रयोगशाली लेखक, प्रकाशक म्हणून परिचित आहेतच. गेली बारा वर्षं शरीर-मनाच्या संतुलनासाठी ते सिद्ध समाधी योग (एस. एस. वाय.), आर्ट ऑफ लिव्हिंग, बिहार योगधाम, विपश्यना, आणि शिवांबूचा स्वत: अनुभव घेत आहेत. लेखन व्यवहाराबरोबर शरीर-मनाच्य आरोग्याचं महत्त्व त्यांनी ओळखलं आहे- त्यांचे योग-शिवांबूचे हे अनुभव शरीर-मनाच्या स्वास्थ्यासाठी सजग असलेल्यांना विनाअषधानं रोगनिवारण्याचा आपला मार्ग शोधण्यास मदतच करतील.
ISBN No. | :9788177865844 |
Author | :Baba Bhand |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :88 |
Language | :Marathi |
Edition | :2010 - 1st/2004 |