Dhyan Kamle (ध्यान कमळे)
Dhyan Kamle (ध्यान कमळे)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ध्यान करणे हे एके काळी फक्त देव-देव करणा-या वृध्दांचे काम आहे असे मानले जायचे; पण आधुनिक काळातील जीवनात वाढलेल्या संकीर्णतेमुळे मनावरील ताण कमी करण्यासाठी ध्यान सगळया आबालवॄद्धांसाठी उपयुक्त आहे हे सगळयांनाच पटू लागले आहे. जीवन कसे जगावे किंवा मन:शांतीसाठी ध्यान कसे करावे याविषयी वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळया पद्धती सांगतात. ओशोंनी त्यांच्या प्रवचनांमध्ये त्यांची स्वत:ची अशी खास ध्यानपद्धती विकसित केली आहे. ’ध्यानकमळे’ या पुस्तकात त्यांच्या दहा प्रवचनांचे संकलन केले आहे. ज्यामध्ये ध्यान म्हणजे काय? ते कसे करावे? कोणत्या गोष्टी पाळाव्या आणि कोणत्या टाळाव्यात यांचे सविस्तर वर्णन केले आहे. अत्यंत रसाळ शैलीतील ही प्रवचने केवळ अध्यात्माच्या वाटेवर जाणा-यालाच नव्हे तर प्रत्येक लहानथोर व्यक्तीला उपयोगी पडणारी आहेत. कारण त्यात सांगितलेले मानसिक विरेचन हे सगळया शारिरिक आणि मानसिक व्याधींना बरे करणारे एक अदभुत उपचारक आहे. तसेच आधुनिक काळात संन्यासाचा बदललेला अर्थ कोणता? जीवनाचा पाया कसा आहे? व्दैताकडून अव्दैताकडे कसे जावे? मनाचा मॄत्यू म्हणजे काय? परमेश्वराच्या दारी कसे जावे या अवजड वाटणा-या प्रश्नांना ओशोंनी दिलेली सोपी सरळ उत्तरे अत्यंत मननीय तर आहेतच; पण ही तत्वे आपल्या जीवनात आचारून आपणही एक उदात्त जीवन जगू शकतो.
ISBN No. | :9788177866483 |
Author | :Osho |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :105 |
Language | :Marathi |
Edition | :2011 - 1st/2011 |