Dhyanache Prakar (ध्यानाचे प्रकार)
Dhyanache Prakar (ध्यानाचे प्रकार)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एकविसाव्या शतकातील जीवन प्रत्येक पावलागणिक प्रत्येकासाठीच जास्तीत जास्त तणाव निर्माण करत आहे. गौतम बुद्धांच्या काळाप्रमाणे केवळ ध्यानात शांत बसणे हे या काळात तितके सोपे राहिले नाही.ध्यान : या पुस्तकात ओशोंनी तयार केलेल्या ध्यानाच्या वेगवेगळया पद्धती टप्प्याटप्प्याने शिकविल्या आहेत. यात ओशोंच्या प्रसिद्ध सक्रिय ध्यानाचा आणि ओशोंच्या मेडिटेटिव्ह थेरेपींचाही समावेश आहे. या पद्धती थेट आपल्या आयुष्यात तणाव कमी करण्यास आणि आपल्याला जागरुक, उत्साहवर्धक व शक्तिवर्धक बनविण्यास मदत करतात. ओशो अनेक प्राचीन तसेच सुंदर तंत्राचेसुद्धा वर्णन करतात: विपश्यना आणि झाझेन ध्यानाने केंद्रीकरण, प्रकाशावरील आणि काळोखावरील ध्यान, हदय खुलं करण्यावरील ध्यान इ. यासोबतच, यात ओशोंनी ध्यानासंबधी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ज्यात ध्यान काय आहे, ते सुरू कसे करावे आणि स्वत:ला जाणून घेण्याचा आणि आपल्या सामर्थ्याची पूर्तता करण्याचा आंतरिक प्रवास कसा चालू ठेवावा, याबद्दल माहिती आहे. ध्यानाला सुरुवात आहे; पण शेवट नाही. ते चालूच राहते, अनंत आणि प्रदीर्घ काळासाठी. मन छोटे आहे. ध्यान तुम्हाला स्वत:च्या अस्तित्वाचे भान देते. ध्यान तुम्हाला वैश्विक शक्तींशी एकरूप होण्यास मुक्त करते. "ध्यानाने सुरुवात करा आणि तुम्ही समृद्ध व्हाल- शांती, प्रसन्नता, सुख आणि संवेदनशीलता. ध्यानातून जे काही प्राप्त होईल ते आयुष्यात अवलंबिण्याचा प्रयत्न करा. ते विभागून घ्या. कारण जे काही विभागले जाते ते लवकर वाढते आणि जेव्हा तुम्ही मॄत्यूच्या दारापर्यंत पोहोचता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तेथे मॄत्यूच नाही. तुम्ही त्याला निरोप देऊ शकता, तेथे अश्रूंची किंवा दु:खाची काहीच गरज नाही. कदाचित आनंदाश्रू असतील; पण दु:खाचे नक्कीच नाही."
ISBN No. | :9788177868166 |
Author | :Osho |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :400 |
Language | :Marathi |
Edition | :2013 - 1st/2013 |