Daravaje (दरवाजे)
Daravaje (दरवाजे)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एकोणिसाव्या शतकातील साठच्या दशतकातील किंवा त्यानंतरच्या दोन शतकातील वाचकांसाठी नारायण धारप हे नाव गूढरम्य, अलौकिक शक्तींचे दर्शन आपल्या साहित्यातून घडवणारा एक लोकप्रिय लेखक म्हणून आजही आठवत असेल. त्यांच्या दरवाजे या पुस्तकात वाचकांना भावनेच्या तीन कथा आहेत. ताईत, मध्यस्थ आणि दरवाजे. होणारं चुकत नाही ते चुकवण्याचा प्रयत्न केला तर त्याहूनही भयंकर काहीतरी नशिबी येते. निसर्गाच्या आणि नियतीच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा भयंकर परिणाम ’ताईत’ कथेतील दंपतीला भोगावे लागतात आणि नशिबात नसलेल्या हव्यास धरण्यापाई हातचा-एकुलता एक मुलगाही-गमवावा लागतो. तर एक निरागस मुलीचा मृत आत्म्याची जिवंतपणी अतृप्त राहिलेली आईच्या प्रेमाची तहान पूर्ण करत असतानाचा तिच्या आईच्या मनातील अपराध भावनेची नीरगाठ सोडवण्यात ’मध्य्स्थ’ ठरणा-या मिलिंदची कथा श्वास रोखायला लावते. हीच आपली वेळ, मिलिंदच्या मनात एक अनाहूत विचार आला. तो पुढे झाला. काय करायचं ते त्याला पूर्णपणे समजलं होतं. ज्या क्षणी शकुंतला खाटेवर वाकली त्याच क्षणी त्याने उमाबाईंच्या मिठीतून तो लहान मृतदेह चटदिशी काढून घेतला. त्या मोकळ्या जागेत शकुंतला क प्रकारच्या भयानक शीघ्रतेने शिरली. उमाबाईंना त्या अदलाबद्दलची कल्पना तरी होती का नाही मिलिंदला समजलं नाही. खोलीबाहेर जायच्या आधी एक क्षण त्याने त्या मायलेकीकडे पाहिलं. उमाबाई खाली वाकून प्रेमाने शकुंतला वर्षानुवर्षं तळमळत होती ते तिला या क्षणी मिळालं होतं; सहस्त्रधारांनी मिळालं होतं. तिचा आत्मा तॄप्त झाला होता.
ISBN No. | :9788177868357 |
Author | :Narayan Dharap |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :104 |
Language | :Marathi |
Edition | :2013 - 1st/2011 |