Bhatache Phool (भाताचे फूल)
Bhatache Phool (भाताचे फूल)
Share
Author:
Publisher:
Pages: 133
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गीतरामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पदमश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कादंबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निव्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ’महाराष्ट्र वाल्मीकी’ हे बिरूद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठया आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांचया मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!
ISBN No. | :9788177868487 |
Author | :G D Madgulakar |
Publisher | :Saket Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :133 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |