Sahasi Jivan Kasa Jagal (साहसी जीवन कसं जगालं)
Sahasi Jivan Kasa Jagal (साहसी जीवन कसं जगालं)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
साहसी जीवन कसं जगाल?एका शूरवीर योद्ध्याला अत्यंत कठीण असे सात प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याला कधी घनदाट अरण्यात प्रवास करावा लागला;तर कधी तप्त वाळवंटात पायपीट करावी लागली. कधी पर्वतांवर, डोंगर टेकड्यांवर चढावं लागलं; तर कधी अंधाऱ्या गुहेत ठेचकाळत शोध घ्यावा लागला. अखेरीस त्याला सात कठीण प्रश्नांची उत्तरं गवसली. कारण त्याच्याजवळ होती दोन शस्त्रं, ‘साहस’ आणि ‘योग्य समज’. त्या योद्ध्याचं नाव, ‘हातिम’. वाचकहो, तुम्हालाही हातिमप्रमाणे शोधमोहीम हाती घ्यायची आहे. पण हे शोधकार्य तुम्हाला कोठे बाहेर करायचं नसून, ते तुमच्याच अंतर्यामी करायचं आहे. हातिमचा प्रवास तर अत्यंत खडतर होता; पण तुमची अंतर्यात्रा मात्र सुखद आणि सहज असणार आहे. कारण प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला जीवनरूपी प्रवासातील समस्यांचा, आव्हानांचा सामना करण्यासाठी एकूण चौदा सूत्रं लाभणार आहेत.
ISBN No. | :9788184155365 |
Author | :Sirshree |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |