akshardhara
Jeruslem (जेरुसलेम)
Jeruslem (जेरुसलेम)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जेरुसलेम ही एक वैश्विक नगरी आहे. ती दोन समुदायांची राजधानी आहे आणि तीन धर्मांचं तीर्थस्थान आहे. कयामतच्या दिवसाचं हेच ठिकाण आहे आणि आजच्या इस्लाम आणि पाश्चात्त्य संस्कृतींमधल्या संघर्षाची हीच युद्धभूमी आहे. ही छोटीशी दुर्गम नगरी ‘पवित्र नगरी’ कशी बनली? कशी सार्या जगाचा केंद्रबिंदू बनली? मध्यपूर्वेत शांतता राखण्याची किल्ली या नगरीच्या हाती कशी आली? नव्या स्रोतांतून माहिती मिळवून आणि आयुष्यभराच्या अभ्यासावरून मांटफिऑरी यांनी या सतत बदलत्या नगरीचा इतिहास आपल्याला उलगडून दाखवला आहे. जेरुसलेमची निर्मिती करणारे, तिचा विध्वंस करणारे, तिचा इतिहास लिहिणारे आणि तिच्यावर श्रद्धा ठेवणारे निरनिराळे स्त्री-पुरुष, राजे-राण्या, प्रेषित, कवी, जेते आणि वारांगना यांच्या हकिकती, प्रेमप्रकरणं आणि युद्धकथांच्या माध्यमातून मांटफिऑरी यांनी आपल्यासमोर हा लक्षवेधी इतिहास मांडला आहे. राजा डेव्हिडपासून ते बराक ओबामापर्यंत आणि ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम या धर्मांच्या जन्मापासून ते इस्राइल-पॅलेस्ताईनच्या संघर्षापर्यंतचा हा ३००० वर्षांचा भव्य इतिहास आहे. श्रद्धा, कत्तली, धर्मांधता आणि सहिष्णुतेचा हा इतिहास आहे. एक नगरी, जिचं अस्तित्व इहलोकात आणि परलोकातही आहे. हा जेरुसलेमचा इतिहास आहे.
ISBN No. | :9788184835083 |
Author | :Simon Sebag Montefiore |
Publisher | :Diamond Publications |
Translator | :Savita Damle |
Binding | :Paperback |
Pages | :92 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |

