The Count of Monte Cristo (द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो)
The Count of Monte Cristo (द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
१०० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आलेक्झान्द्र द्यूमास यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद सगळ्यांचं भलं चिंतणार्या, हुशार आणि साध्या-सरळ एडमंड डान्टेला लवकरच जहाजाच्या कप्तानपदी बढती मिळणार असते. मग तो जिवापाड प्रेम असणार्या त्याच्या प्रेयसीशी लग्न करून सुखाने संसार थाटणार असतो; पण डान्टेकडे असलेल्या एका पत्राने त्याच्या आयुष्यात अचानक एक भयंकर वादळ घोंगावत येतं आणि त्याचं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकतं. जिगरबाज एडमंड डान्टेशी दगाफटका करून त्याचे शत्रू त्याला एका गुप्त तुरुंगाच्या काळकोठडीत डांबून टाकतात आणि सर्वस्व गमावून अवघं आयुष्य त्या अंधार्या तुरुंगात घालवणं त्याच्या नशिबी येतं ! डान्टेच्या सगळ्या स्वप्नांचा, इच्छा-आकांक्षांचा चुराडा होतो. तो इतका निराश होतो की, आत्महत्येचा विचार करायला लागतो; पण तोच त्याला एक आशेचा किरण दिसतो, ज्यामुळे त्याची तुरुंगातून चमत्कारिकरीत्या सुटका होते; पण तुरुंगातून बाहेर पडलेला डान्टे पूर्वीचा ‘साधा-सरळ’ डान्टे राहिलेला नसतो. तो झालेला असतो, हुशार, कपटी आणि सुडाच्या आगीने पेटलेला - ‘द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’! आलेक्झान्द्र द्यूमासच्या जवळपास सगळ्या कादंबर्या नेपोलियनच्या वादळी पर्वाच्या पार्श्वभूमीवर घडतात. त्यांपैकी ‘द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो’ ही थरारक साहसकथा जगातल्या सर्वांत लोकप्रिय रोमांचक कादंबर्यांपैकी एक गणली जाते. ऐश्वर्याच्या, प्रभावाच्या शिखरावर असलेल्या नेत्रदीपक, जोशपूर्ण फ्रांसचं कादंबरीतलं वर्णन अजरामर ठरलं आहे. तसंच सुष्ट-दुष्ट यांच्यातला नाट्यमय संघर्ष आणि विलक्षण गुंतागुंतीचं कथानक असल्याने ही कादंबरी वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवते !
ISBN No. | :9788184836714 |
Author | :Alexandre Dumas |
Publisher | :Diamond Publications |
Translator | :Pranav Sakhdev |
Binding | :Paperback |
Pages | :252 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |