Chicken Soup For The Couples Soul (चिकन सूप फॉर द कपल्स सोल )
Chicken Soup For The Couples Soul (चिकन सूप फॉर द कपल्स सोल )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
देवाने गाठी जरी स्वर्गात बांधल्या, तरी विवाह साजरे होतात इथे पॄथ्वीवरच! ते निभवावेही लागतात आपल्या तुपल्यालाच! कसं निभावतो आपण हे नातं? - त्याच्या या कथा! एकांडया आयुष्यात दुस-याचा प्रवेश झाला, की जीवनाचे आयाम बदलतात. मग प्रेमाच्या बहरात सप्तरंगी स्वप्नं फुलतात. रोमान्स, स्फूर्ती, उत्साहाची कारंजी उडतात. जबाबदारी वाढली की संघर्ष आला - संकट आली! एकमेकांच्या मदतीनं त्यांनाही तोंड देण्याची हिंमत येते. प्रेम कार्यप्रवण बनवतं - प्रेम व्यक्तीला स्वतंत्र करतं. कधी भानावर आणायचं कर्तव्य पार पाडतं - कधी आत्मभान जागॄत करतं! एकमेकाला गॄहीत धरलं तरी एकमेकांचा आदर करायला शिकवतं. मुरलेलं प्रेम जन्मोजन्मीची साथ करतं. ह्ळुवार प्रेम तितकंच कणखरही असतं. कुटुंब-समाज अशा अवघ्या पसा-यात स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घ्यायला प्रवॄत्त करतं. पती-पत्नीच्या सहजीवनाच्या अशा या कथा आपल्या प्रत्येक भावनेला स्पर्श करतात. काही कथा जुन्या- पण आजही तितक्याच ताज्या वाटणा-या कालातीत! देशातीतही फरक फक्त संस्कॄतीचा आहे. पाश्चात्य संस्कॄतीच्या चष्म्यातून कथा वाचल्या, की लक्षात येतं, अरे या तर आपल्याच कथा आपल्या आयुष्यात आपल्या आसपास घडणा-या! कपल्ससाठी असणारं हे ’चिकन सूप’ ’तुमचं’ - आमचं सेम असतं’ याची प्रचीती देणा-या’!
ISBN No. | :9788184981353 |
Author | :Kiran Bedi |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :238 |
Language | :Marathi |
Edition | :2011/07 - 1st/2010 |