Chicken Soup For The Sisters Soul (चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल )
Chicken Soup For The Sisters Soul (चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्याला बहीण असणं आणि आपण कुणाची तरी बहीण असणं किती भाग्याचं आहे याचा साक्षात्कार घडवणा-या हदय कथा! "ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी असते." "तिच्याविना मी सैरभैर होईन!" "मी तिला काहीही सांगू शकते." "मी तिच्याशी दिवसा-रात्री कधीही बोलू शकते." ’चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल’ मधल्या कथांमधून वारंवार येणारी ही वाक्यं खूपच बोलकी आहेत. हे पुस्तक म्हणजे हया अनोख्या नात्याची थोरवी मानण्याचा एक उत्सवच आहे! बहिणी असतात आपल्या अत्यंत मौल्यवाण अनुभवांच्या खजिनदार. आपली सुख-दु:ख वाटून घेणा-या साक्षीदार. कुटुंबाच्या वाटयाला आलेले काळेकुट्ट क्षण जोडीनं भोगणा-या सख्या. आपल्याला सार्वाधिक ओळखणा-या आपल्या मैत्रिणी. विविध अनुभवांव्दारे या कोमल नात्याचे अनेक तलम पदर उलगडून दाखवणा-या हया प्रेरणादायी कथा आपल्या मनाच्या सहसंवेदनेची तार झंकरात ठेवतात!
ISBN No. | :9788184981360 |
Author | :Jack Cenfield |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :332 |
Language | :Marathi |
Edition | :2010/07 - 1st/2010 |