Bendbaja (बेंडबाजा)
Bendbaja (बेंडबाजा)
Share
Author: D. M. Mirasdar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 152
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसरपणा इ. माणसांचे ‘सद्गुण’ म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कच्चा मालच. ग्रामीण आणि नागर दोन्ही भागात हा कच्चा माल भरपूर प्रमाणात असतो. प्रत्येक विनोदी लेखकामागे एक मिश्किल माणूस दडलेला असतो आणि तो हा कच्चा माल बरोब्बर हेरून त्यातली विसंगती खेळकर पध्दतीने शब्दबध्द करतो. पंढरपूरसारख्या अर्धग्रामीण भागात बालपण घालवलेल्या द. मा. मिरासदारांना असा कच्चा माल भरपूर प्रमाणात गवसला असल्यास नवल नाही. अशा ‘सद्गुणी’ माणसांचे वेचक अनुभव ते आपल्या खुमासदार शैलीत कथन करतात. तेव्हा सामान्यांना अगदी साध्यासुध्या वाटणार्या घटनासुध्दा मजेशीर परिमाण घेऊन आपल्यासमोर येतात. द. मां. च्या लेखनाचे एक वैशिष्ट्य असे की ते केवळ इतरांच्याच अनुभवाकडे मिश्किल नजरेने पाहतात असे नव्हे, तर स्वत:चीही फिरकी घेतात. अशा स्वत:च्या घेतलेल्या अनेक फिरक्यांचे हसवणारे सूर या ‘बेंडबाजा’ मधून ऐकू येतील.
ISBN No. | :9788184982312 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :156 |
Language | :Marathi |
Edition | :2011/03 - 4th/1994 |