akshardhara
Guernsey Vachak Mandal (गर्नसी वाचक मंडळ)
Guernsey Vachak Mandal (गर्नसी वाचक मंडळ)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 248
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: Maitrayi Joshi
लंडनही या युद्धाच्या छायेतून वर येतंय. पुन्हा ‘जीवनाला’ सामोरं जातंय. ‘इझ्झी गोज टू वॉर’ या पुस्तकाने प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आलेली ज्युलिएट आता तिच्या पहिल्या पुस्तकासाठी विषय शोधतीये आणि तसा तिला तो मिळालाही – गर्नसीकडून. चार्लस् लँबचा नि:स्सीम भक्त असलेला डॉसी एका प्रतीवर ज्यूलिएटचं नाव पाहून तिला पत्र धाडतो. त्याला लँबची अन्य पुस्तकं कुठं मिळतील विचारायचं असतं आणि इथून सुरू होतो हा पत्रांचा सिलसिला.
ISBN No. | :9788184982480 |
Author | :Annie Barrows |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Maitrayi Joshi |
Binding | :Paperback |
Pages | :248 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2011 |
पुस्तकाचे नाव- गर्नसी लिटररी अॅन्ड पोटॅटो पील पाय सोसायटी
( गर्नसी वाचक मंडळ)
लेखकाचे नाव- मेरी अॅन शाफर,अॅनी बरोज
अनुवाद - मैत्रेयी जोशी
साल १९४६. नुकतेच दुसरे महायुद्ध संपले आहे. या कादंबरीची नायिका ज्युलिएट अॅशटन एक लेखिका आहे जिचे 'इझी गोज टू वाॅर' हे पुस्तक प्रसिद्ध झाले अाहे.ती दुसर्या पुस्तकासाठी विषय शोधते आहे. त्याचवेळेस गर्नसी बेटावर राहणारा डाॅसी अॅडम्स नावाचा रहिवासी ज्युलिएटला पत्र पाठवतो. त्याच्याकडे चाल्स्र लँबचे एक पुस्तक असते ज्यावर ज्युलिएट चे नावअसते.कदाचित ती चाल्स् लँबची पुस्तके कोठे मिळतील हे सांगू शकेल म्हणून तो तिला पत्र लिहितो.
गर्नसी हे एक ब्रिटिश बेट असतं ज्याचा ताबा युद्धकाळात नाझींनी घेतलेला असतो आणि त्यांनी या बेटावरच्या लोकांचे जिणे हराम केलेले असते. जसजसे ज्युलिएट आणि डाॅसी एकमेकांना पत्र पाठवत राहतात तसतशी ती गर्नसी बेटावरच्या माणसांकडे ओढली जाते.
डाॅसी आणि त्याच्या मित्रमंडळींनी या गर्नसी वाचक मंडळाची स्थापना केलेली असते. युद्धकाळात संचारबंदी असलेल्या काळोख्या रात्रींमध्ये या सगळ्या लोकांना जवळ आणलं ते या वाचक मंडळानेच.
या मंडळाची खरी सुरवात एका मेजवानीमुळे होते. एका रात्री ही मंडळी चोरून एक डुक्कर भाजतात व त्याचा चट्टामट्टा करतात. चोरून अशासाठी की त्या काळात डुक्कर जवळ बाळगणे अपराध मानला जाई.शेतात पिकलेले धान्य, फळे, भाजीपाला, कोंबड्या, डुक्कर, गाईगुरे हे सगळे नाझी सैनिकांनी ताब्यात घेतलेले होते. संचारबंदीच्या काळात एकमेकांच्या घरी जाणं हाही गुन्हा ठरत होता. मेजवानीच्या त्या रात्री ही मंडळी म़ौजमजा करुन गुपचूप आपल्या घरी परतत असताना सैनिकांच्या तावडीत सापडतात. तेव्हा त्याच्यातील एक मैत्रीण एलिझाबेथ सैनिकांना थाप मारते की आम्ही एक वाचक मंडळ सुरू केलय आम्ही एकमेकांच्या घरी जमतो व पुस्तकांचे वाचन करतो. जेव्हा ते सैनिक मंडळाचे नाव विचारतात तेव्हा ती हे 'गर्नसी लिटररी अॅन्ड पोटॅटो पील पाय सोसायटी 'हे विचित्र पण मजेशीर नाव अचानक तयार करते व त्यांना सांगते. त्यामुळे या सगळ्या मंडळींची सुटका होते. तेव्हापासून ते खरंच पुस्तके वाचायला सुरूवात करतात. हळूहळू डाॅसी बरोबर त्याची मित्र मंडळीही ज्युलिएट ला पत्र लिहायला लागतात. त्यांच्या पत्रातून तिला गर्नसी बेटाविषयी, त्यांच्या आवडीनिवडींविषयी ,नाझी अमलातून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या व सुटकेचा श्वास सोडलेल्या समाजजिवनाविषयीची माहिती मिळत जाते. तिला यावर पुस्तक लिहावसं वाटतं. गर्नसी बेटाची ओढ लागते आणी ज्युलिएट बेटावर पोहोचते.पुढे काय होते ते तुम्हीच पुस्तक वाचून जाणून घ्या.
या पुस्तकावर आधारित एक सिनेमा Netflix ने काढला आहे. पुस्तकातील सगळंच काही चित्रपटात नाहीये पण गर्नसी बेटाचं सौंदर्य चित्रपटात बघायला मिळते. तसेच ज्युलिएट आणी डाॅसी चे काम लिली जेम्स आणि मायकेल ह्यूजमन यांनी छान केलयं. तर पुस्तक नक्की वाचा आणि चित्रपट नक्की बघा.
- उमानिजसुरे