Manase Arabhat Ani Chillar ( माणसे अरभाट आणि चिल्लर )
Manase Arabhat Ani Chillar ( माणसे अरभाट आणि चिल्लर )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे, व क्षणाक्षणाला त्यावरून पाने तुटून वार्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले, व दातारमास्तर देखील गेले. रामलक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मिकी नाहीसे झाले, त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा, ही पानेदेखील गेली. टेक्सासमध्ये दूर कुठेतरी एक ऒळखीचे पान आहे, पण तेदेखील फार दिवस टिकणार नाही. माझादेखील अधीतरी अश्वत्थाशी असलेली संबंध तुटेल, आणि मातीच्या ऒढीने मला खाली यावे लगेल. अश्वत्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणार्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी थांबतच नाही. प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित समजत नाही, समजत नाही असे म्हणत एक उच्छवास सोडत असेल. त्यांच्या उच्छवासामुळे वार्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात समजत नाही, समजत नाही. का समजत नाही, समजत नाही हेच ते सार्याबाबतचे अखेरचे शब्द असतील ? आणि ते देखील समजत नाही.
ISBN No. | :9788186530863 |
Author | :G A Kulkarni |
Publisher | :Parchure Prakashan Mandir |
Binding | :paperbag |
Pages | :136 |
Language | :Marathi |
Edition | :1st 1988/ 7th 2017 |