akshardhara
Katha Vaktrutvachi (कथा वक्तृत्वाची)
Katha Vaktrutvachi (कथा वक्तृत्वाची)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 121
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
वक्तृत्व हा माझ्यापुरता एक अनुभव विषय आहे. मी आजवर अनेकांची अनेक भाषणे ऎकली. तेवढीच भाषणे स्वत:ही केली. बोलणे माझ्या वाट्याला आले आणि मी बोलण्याच्या वाट्याला गेलो. आपण सतत बोलत राहावे आणि बोलता बोलता जीवन सार्थकी लागावे, असे मला लहानपणापासून वाटत असे. पण बोलायचे कोणाशी? बोलायचे कशासाठी? आणि कोणी आपले ऎकूनच घेतले नाही तर बोलायचे तरी कसे? माणसाने बोललेच पाहीजे का? कमीत कमी बोलणे करून माणसे सुखाने जगू शकतात हे दिसत असताना आपण बोलण्याच्या फंदात का पडावयाचे? गरजे पुरते बोलणे हे स्वाभाविक आहे. त्याहून अधिक बोलणे ही गरज आहे का? थोड्या पाण्यात स्नान होऊ शकते हे खरे! पण नदीत पोहणे, पाण्यात डुंबणे किंवा दूरची खाडी पोहत पार करणे या प्रक्रियांचे अस्तित्व उरतेच ना? जीवनशक्तीचे प्रकटीकरण अनेक माध्यमांतून घडते. शब्दशक्ती हे जीवन शक्तीचे एक रूप नव्हे का? तिच्या अभिव्यक्तिला मर्यादा का पडाव्या? माझ्या मनात उद्भवणार्या माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम परिस्थिती करत होती.
ISBN No. | :9788190874359 |
Author | :Shivajirao Bhosale |
Publisher | :Aksharbramha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :121 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

