akshardhara
Kokanatil Naman Khele ( कोकणातील नमन खेळे )
Kokanatil Naman Khele ( कोकणातील नमन खेळे )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पूर्वरडगातील बारा नमन ते उत्तरड्गातील आरती हे नमन खेळे या लोकनाटयप्रकाराचे रड्गतंत्र आहे. कोकणातील नमन खेळे सादर करणार्या मंडळींनी हे रड्गतंत्र जाणीवपुर्वक टिकून ठेवलेले आहे. काहींनी नमन खेळेच्या ढाच्याला धक्का न पोहचवता शक्य तितके बदल केलेले दिसून येतात. उदा. पडद्यावरच्या गणपतीऎवजी सिंहासनावर बसलेला, उंदीरावर बसलेला गणपती दाखविणे, गणेश जन्माची कथा रडगमंचावर दाखविणे, नमन खेळेच्या प्रवेशापुर्वी श्री विष्णूची देवसभा दाखविणे इ. नमन खेळे हा कुणबी समाजाने संवर्धन केलेला कलाप्रकार आहे. त्यामुळे कुणबी समाजाच्या संस्कृतीला, परंपरेला व कलापरंपरेला अनुसरून त्याचे सादरीकरण होत असते. नमन खेळे हा याच मातीतील हा कलाप्रकार असल्याने, कुणबी समाजाच्या जीवन विकासाबरोबर ह्या कलाप्रकाराचे संगोपन, संवर्धन झालेले दिसून येते.
ISBN No. | :9788194927723 |
Author | :Suryakant Ajgoankar |
Publisher | :Lalit Publication |
Binding | :paperbag |
Pages | :170 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

