Aamhi Kabadache Dhani ( आम्ही काबाडाचे धनी )
Aamhi Kabadache Dhani ( आम्ही काबाडाचे धनी )
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इंद्रजित भालेराव यांच्या कवितेचा नायकही अशा अनेक दिव्यांपैकी एक आहे, ज्याची नाळ मातीशी बांधली गेलेली आहे. 'माती असशी, मातीत मिळशी' असं माती कुंभाराला म्हणते, तरीही तो जीवाच्या आकांताने तिला तुडवत असतो. आपल्या जीवनमरणाचे सारे संदर्भ मातीशी एकरूप झालेले आहेत, हे जाणून तो आयुष्यभर तिच्यातून दिव्यभव्य असं सृजनात्मक स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत असतो. आपल्या हाताने निर्माण केलेल्या या सृष्टीच्या मोबदल्यात तो मातीत मिळणे समाधानाने स्वीकार करतो. आपला नायकही असाच आहे, भुईतून उगवलेला अन घाम गाळत झिजून झिजून मातीत मिळणारा. आतडी फाटेस्तोवर कष्ट करूनही आपल्या हाती बाकी काही येत नाही हे कटू सत्य त्याला जाणवलेले असते, तरीही त्याला आपल्या ठाईची सृजनशीलता गप्प बसू देत नाही. म्हणूनच शेतकरी कधी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे संपावर जात नाही किंवा गिरणी मालकांप्रमाणे आपल्या शेतीच्या व्यवसायाचे दिवाळे काढत नाही.
जन्माला येताच तोंडात माती घालणारा... पावलं टाकायला लागला की ओल्या मातीचे बैल करणारा... कळता झाला की खऱ्याखुऱ्या ढोरामागं जाणारा... लग्न झाल्यावर आपल्या लाडक्या सगुनासोबत ढोरकाम करणारा... सगुना पोटातल्या गर्भासह पुरात वाहून गेल्यावर तिच्या वियोगाचे कढ आतल्या आत दाबून पुन्हा मातीशी एकरूप होणारा...
ISBN No. | :9788195135943 |
Author | :Indrajit Bhalerao |
Publisher | :Aditya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :119 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |