Bhuminishthanchi Mandiyali (भूमिनिष्ठांची मांदियाळी)
Bhuminishthanchi Mandiyali (भूमिनिष्ठांची मांदियाळी)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भूमिनिष्ठा हा मूळ पिंड कवीचा. सखोल अभ्यास आकलनाची आस संयमी सातत्य आणि शब्दकाव्यात कायम तुडुंब असलेल झपाटलेपण इंद्रजित भालेरावांना सतत पुस्तकपानांभोवती बांधून ठेवत एकेक व्यक्तिरेखा शब्दांत साकारताना आधीचे बरेच दिवस त्यांना अस्वस्थ आणि अशांत ठेवत असतात. बारीकसारीक गोष्टींपासून समग्र माहिती त्याच्या चिंतनाच्या अग्रभागी असते. त्याच्या ओघवत्या शैलीतून दीर्घकविता आकार घेते. यातील काही कविता थेट व्यक्तींशी संवाद साधताना दिसतात. कबीर इथे दिसतो, उदया तिथे अजून कुठे कष्टकर्यांच्या वस्तीत, कपाटातील पुस्तकात, शेतातल्या देवळात गावातल्या वेशीवर, त्या त्या वेळी कवितेतून त्यांच्याशी संवाद साधल्या जातो.अरे कबीरा, परवा तुला नेटवर पाहिल. अशी कवितेत आत्मीय नात असल्याची शैली उतरली आहे. कौतुकान जरा दूरवरून त्यांच एकमेकां व्यक्त होण रसिक अनुभवत राहतो.कवितेचा उत्कट शेवट बघा देवाशिवाय धर्म धर्माशिवाय अध्यात्म म्हणजे तुझी कविता अध्यात्माने ओली केल्याशिवाय जमीन कसे अंकुरतील कोंब कवितेचे शेवटी कविता हेही अध्यात्मच असत ना म्हणून फकिरीतच रमतात खरे कवी! कवी पाशवर लिहिलेली दीर्घ कविता कवीचे मन पाशविषयी किती सजग, संवेदनशील झाले आहे हे कळते. अत्यंत हळूवारपणे पाशच्या अवघ्या जीवनाशयाला बिलगलेली ही कविता आहे. तादत्म पावणे, एखाद्या गोष्टीत समरस होणे काय असते ते कवी पाशविषयीची वाचताना कवी किती विभोर होऊन त्याच्यात उतरला आहे हे लक्षात येते.
ISBN No. | :9788195135998 |
Author | :Indrajit Bhalerao |
Publisher | :Aditya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :156 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |