akshardhara
Unraubik ( अनरउबिक )
Unraubik ( अनरउबिक )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अनरउबिक ह्या थेट नावापासूनच वेगळ्या असणार्या कादंबरीचे वेगळेपण अगदी शेवटच्या पानापर्यंत जाणवत राहते. मराठीतील समकालीन कादंबर्या विचारात घेता विवेक कुलकर्णी ह्यांनी केलेला हा प्रयोग महत्वाचा आहे. ते राहत असलेल्या लातूर शहराशी निगडित राजकीय घराण्याचा आडनावापुरता वापर केलेल्या ह्या आशयद्रव्यामध्ये थेट दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील व्यक्ती आणि प्रसंग तसेच मराठी लेखक, समीक्षकांची उदधृते ह्यांचा चतुराईने वापर केलेला आहे. मात्र, राजकीय मंडळींचा एवढ्या सढळ हस्ते वापर करूनही ही कादंबरी राजकीय होत नाही. त्यांची काही निरीक्षणे ही लक्षणीय आहेत. कथनाचे स्वरूपही टप्प्याटप्प्यावर बदलते; शेवटाकडे तर ते थेट पटकथासदृश होत जाते. तर ह्या सर्व आगळिकींमुळे अनरउबिक हा समकालीन मराठी कादंबर्यांतील एक महत्त्वाचा प्रयोग ठरावा. मराठी साहित्याची सशक्त आगेकूच होण्याच्या दृष्टीने असे प्रयोग होणे गरजेचे आहे. विवेक कुलकर्णी ह्यांचा प्रयोगशील पिंड विचारात घेता, त्यांच्याकडून अधिकाधिक अपेक्षा बाळगाव्यात असा अनरउबिक हा प्रयोग आहे.
ISBN No. | :9788195163779 |
Publisher | :Golden Page Publication |
Binding | :paperbag |
Pages | :142 |
Language | :Marathi |
Edition | :1 |

