Rahasyamay Peru ( रहस्यमय पेरू )
Rahasyamay Peru ( रहस्यमय पेरू )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पेरु देश म्हणजे गूढ आणि रहस्यमय ठिकाणांची खाण. स्पॅनिशांनी आक्रमण करून या देशावर पाच शतके राज्य केले. पाषाणांच्या इमारतीवर अवाढव्य राजवाडे बांधले. आजही पाया खोदला, तर लाखो सांगाडे मिळतात. लिमा शहरात फिरताना पावलोपावली जुन्या काळाच्या खुणा आढळतात. हा देश पाहताना आपल्या मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते.परकास बेटावरील अवाढव्य त्रिशूल थेट रामायणाशी नाते सांगतो का ? विज्ञान, तंत्रज्ञान आणि तर्कबुध्दी यांना अद्याप ज्यांचे कोडे पूर्णपणे उलगडता आलेले नाही, त्या नाझ्काच्या रेखाकृती मानवनिर्मित आहेत की परग्रहवासीय एलियननी साकारलेल्या ? विस्तीर्ण पठारावर विसावलेल्या या प्राणी पक्षी मानवाच्या रेखाकृती म्हणजे जणू नोहाची नौकाच ! त्यांचे संपूर्ण दर्शन आधुनिक काळात मानवाला झाले, तेच मुळी विमानातून ! इतिहासाच्या पोटातील अशी अनेक गूढ रहस्ये आपल्या भूमीवर वागवणार्या देशाशी वेधक सफर.
ISBN No. | :9788195170845 |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :156 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |