akshardhara
Mughal Samrajya Akbar ( मुघल साम्राज्य अकबर )
Mughal Samrajya Akbar ( मुघल साम्राज्य अकबर )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हुमायूनचा झंजावाती काळ संपून सुरू झाला मुघल सम्राटांच्या मालिकेतील अतिशय देदीप्यमान सम्राटाचा कालखंड शहेनशहा अकबराचा कालखंड. साल १५५६. अकबराच्या कालखंडाची सुरूवात झाली ती रक्तरंजित युध्दानच. त्या वेळी त्याच वयही किरकोळच होत. परंतु लवकरच त्यान स्वत:ला अत्यंत शूर, आत्मविश्वान पुरेपूर भरलेला आणि वेळप्रसंगी अत्यंत निष्ठुरपणे निर्णय घेणारा राजा म्हणून सिध्द केल. अकबरान आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. भारतीय उपखंडाचा दोन तृतीयांश भाग आणि दहा कोटींच्या वर प्रजानन अस त्याच साम्राज्य पसरल. सर्व धर्मांचा आदर करणारा, कला, संगीत, धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र, साहित्य, तत्त्वज्ञान अशा क्षेत्रांमध्ये रूची असणारा व न्यायदानात कुठलाही भेदभाव न करणारा अतिशय न्यायी शासक अशी त्यान स्वत:ची ख्याती निर्माण केली.
त्याच्या काळामध्ये प्रजाननांमध्ये एक स्थैर्याची भावनाही निर्माण झालेली दिसते. त्याच्याच काळात मुघल साम्राज्यान ऎश्वर्याची क्षितेजे ओलांडली. स्थानिक राजघराण्यांशी सोयरसंबंध प्रस्थापित करून इथल्या मातीशी तो एकरूपही झाला. अस असल तरी त्याच्या या देदीप्यमान कारकिर्दीत एक चिंता आहेच. सम्राटाचा कोणताही मुलगा मुघल साम्राज्याचा वारसदार बनू शकतो, फक्त थोरला मुलगाच नव्हे! अकबराचा मुलगा सलीमही वयात आणि सुरू झाली सत्तासंघर्ष! सलीमची मुलेही वयात आली आणि या संघर्षाच्या बीजाला अजूनच धुमारे फुटले!
ISBN No. | :9788195279081 |
Author | :Alex Rutherford |
Publisher | :Scion Publications Pvt Ltd |
Translator | :Mustajib Khan |
Binding | :paperbag |
Pages | :507 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

