Skip to product information
1 of 2

akshardhara

Don Chak Jhapataleli ( दोन चाक झपाटलेली )

Don Chak Jhapataleli ( दोन चाक झपाटलेली )

Regular price Rs.612.00
Regular price Rs.680.00 Sale price Rs.612.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

२००० सालापूर्वीचा इंटरनेट सेलफोन जमान्यापुर्वीचा काळ असला म्हणून काय झाल? आमची दोन चाक जेव्हा गरूडभरारीची झाली तेव्हा देशोदेशींचे रस्ते जणू आकाशासारखे मुक्त झाले. आयफेल टॉवर, नायगारा,ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तर हॉटेलांत मुक्काम करणारे सारेच पर्यटक पाहतात. आमचा मुक्काम तंबू ठोकून वा युथ होस्टेलमध्ये झाला. देशोदेशींची पर्यटकप्रिय स्थळ निसर्गनिर्मित नि मानवनिर्मित चमत्कार आम्ही पाहिलेच. पण त्याहीपलीकडे.. १८६७ साली बनलेली आदिम सायकल, शतकापूर्वी मातीत सोन्याच्या अंश सापडल्याने जी सुवर्णभूमी झाली होती, तिची सुवर्णांश ओसरल्यानंतर झालेली ओसाड भूतनगरी न्यूडबीच वरच नग्नविश्व, नशाबाजांच्या सुयांच्या खचांमुळे, झाडाफुलांच्या उद्यानाच झालेल निडल पार्क, आदी अनवट चिजा त्या ३२० दिवसांच्या भ्रमंतीत आम्हाला पाहता आल्या. हॉलंडमधल्या गुरुद्वारात खलिस्तानी पासपोर्ट- व्हिसा आणि खलिस्तानी चलनाच्या प्रतिकृती पाहताना आम्ही क्षोभग्रस्त, शोकाग्रस्त झालो. जगातले २४ देश सायकलींवरून फिरताना, भिन्नभिन्न संस्कृती, भाषांचे अडसर आणि परदेशस्थ भारतीयांची स्वदेशओढीमुळे होणारी अखंड काळीजकुरतड आम्हाला अनुभवता आली. सायकलवापर प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी हा जिवंत संदेश, शब्दांशिवाय कृतीने नि भारत देशाच्या वतीने देत फिरताना आमचे देशोदेशी सत्कार झाले. पण त्याहून महत्त्वाच हे होत की -५ ते +४८ अंश सेल्सियस अशा परस्परविरोधी, भयकारी तापमानातून क्रूर वादळवार्‍यातून दिवसातले कित्येक तास सलगपणे सायकल चालवताना आम्हाला आमच्या क्षमता तपासून पाहता आल्या. मोहिमेच्या आखणीतल्या आव्हानाने आणि त्या ३२० दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सायकलसफरीने आम्हाला ह्यातभराची समृध्दी दिली.

ISBN No. :9788195373017
Author :Sumedh Vadavala (Ris
Publisher :Amit Prakashan
Binding :paperbag
Pages :360
Language :Marathi
Edition :1st 2014/ 2nd 2022
View full details