Skip to product information
1 of 2

akshardhara

Sakhaliche Swatantrya ( साखळीचे स्वातंत्र्य )

Sakhaliche Swatantrya ( साखळीचे स्वातंत्र्य )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.225.00
-25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन, मेटाव्हर्स, वेब ३.०, टोकनॉमिक्स, एनएफटी... इत्यादी शब्दांचा भडिमार समाजमाध्यमांपासून दैनंदिन व्यवहारांपर्यंत आताशा होऊ लागला आहे. या सार्‍याबद्दल विद्यार्थ्यांपासून विविध क्षेत्रांत काम करणार्‍या मंडळींपर्यंत, सर्वांच्याच मनात जितकी उत्सुकता आहे, तेवढेच गैरसमजही पसरलेले आहेत. याचे कारण हे सारे ज्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे, त्याविषयी पुरेशी माहिती नसणे. ब्लॉकचेनविषयी जाणून घेतल्यास हे स्पष्ट होते की, ते निव्वळ तंत्र ज्ञान नसून तत्त्व ज्ञानही आहे. 

हे पुस्तक ब्लॉकचेनच्या या दोन्ही बाजू सोप्या पध्दतीने, तरी सखोलपणे समजावून देते. ते करताना, अर्थकारण समाजकारणाचे दाखले देत ब्लॉकचेन तंत्रज्ञान ज्या संगणकशास्त्राशी संबंधित आहे, त्यातील मूलभूत संकल्पनांचा आढावा घेते. त्या संकल्पनांच्या आधारावर ब्लॉकचेन तंत्रज्ञान कसे तयार होते आणि बिटकॉइन ची घडण कशी होते, हे दाखवून देते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे विविध प्रकारही या पुस्तकात वाचायला मिळतातच; शिवाय बॅंकिंग, वित्त, प्रशासनापासून शेती ते मनोरंजन क्षेत्रापर्यंत- ब्लॉकचेनमुळे होऊ घातलेल्या बदलांचे चित्रही स्पष्ट होते.

त्यामुळेच इंटरनेटप्रमाणेच ब्लॉकचेन हे येत्या काळातील खर्‍या अर्थाने क्रांतिकारक तंत्रज्ञान ठरू शकते. पण ते तसे ठरण्याकरिता या तंत्रज्ञानाची नेमकी जाण सर्वांनाच व्हायला हवी. तरच या आगामी क्रांतीचे आपण केवळ प्रेक्षक न राहता, त्या क्रांतीला अर्थपूर्ण दिशा देऊ शकू... आणि त्यासाठीच ब्लॉकचेन क्षेत्रात राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या तरूण, अभ्यासू तंत्रज्ञाचे हे पुस्तक!

ISBN No. :9788195377244
Author :Gaurav Somvanshi
Publisher :Madhushree Publication
Binding :paperbag
Pages :245
Language :Marathi
Edition :2022
View full details