akshardhara
Goggle Lavalela Ghoda ( गॉगल लावलेला घोडा )
Goggle Lavalela Ghoda ( गॉगल लावलेला घोडा )
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गॉगल लावलेला घोडा मधल्या सर्वच कथा जीवनातल्या अपूर्णत्वाला पूर्णत्व देण्याच्या तीव्र प्रेरणेतून लिहिल्या गेल्या आहेत. प्रत्येक लेखकाच्या मनात त्याच असं एक विश्व साकारलं आहे. अपुऱ्या, एकारलेल्या, एकसाची, सपाट बनलेल्या जीवनाबद्दलच असमाधान दाखवण्यासाठी चित्रेंनी या कथांचा आरसा त्या वास्तव जीवनासमोर धरला आहे. पण मराठी वाचकांच्या मनवळणी पडलेला, वास्तवाच हुबेहूब दर्शन घडवणारा हा आरसा नाही. चित्रविचित्र आकारांच्या भुलभुलैय्यात वाचकाला हरवून टाकणारा, त्याला स्वत्वाचा शोध घ्यायला भाग पाडणारा, हा चमत्कारिक भासणारा आरसेमहाल आहे. हे लेखकांनी उभारलेलं एक समांतर विश्व आहे. या विश्वाच्या आणि त्यात वावरणाऱ्या माणसांच्या वर्तणुकीमागे एक स्वतःचा तर्क, कार्यकारणभाव आहे. एकदा का त्याची नासा पकडली की वाचकाला या कथांपासून मिळणारा आनंद आणि आयुष्याबद्दलची खोलवरची उमज ही मराठी कथासाहित्यात अन्यत्र अनुभवायला मिळण अशक्य आहे.
| ISBN No. | :9788195436385 |
| Author | :Nikhilesh Chitre |
| Publisher | :Papayras Prakashan |
| Binding | :Hardbund |
| Pages | :233 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
